Chhatrapati Sambhajinagar : उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड ! लाच घेताना रंगेहात पकडलं, 59 तोळं सोनं, लाखो रुपये आणि...
महाराष्ट्रांमध्ये सध्या गुन्हेगरीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच लाचखोरीच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला लाच घेताना अटक केली आहे. शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. त्यानुसार, 23 लाख रुपये त्यांच्या घरीदेखील पोहोचले. मात्र नंतर 18 लाख रुपयांची मागणी केली. मात्र नंतर याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचून अटक केली आहे.
नंतर त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता मोठं घबाड पोलिसांना सापडलं आहे. त्यामध्ये, तब्बल 50 लाख रुपयांचे सोनं आहे. 589 ग्रॅम म्हणजेच 59 तोळे सोनं एसीबीने जप्त केलं आहे. तसेच 18 पैकी 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला रंगेहात ताब्यात घेतले.
खिरोळकरच्या घरी काय काय सापडलं ?
एसीबीने विनोद खिरोळकरच्या घराची तपासणी केली असता घरातून तब्बल 13 लाख 6 हजार 380 रुपये, सुमारे 59 तोळे सोन्याचे दागिने, 3 किलोग्राम वजनाचे चांदीचे दागिने, आणि मौल्यवान वस्तु आणि रोख रक्कम अशी एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.